महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतरही ( Maharashtra Assembly Election Results 2025 ) राजकीय कलह सुरुच असल्याचे दिसून येतंय. बीडमधील ( Beed ) सरंपच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh Murder ) यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांचा राजीनामा मागितला जातोय. अशातच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री ( Namdev Shastri ) यांनी मुंडेंची भक्कम पाठराखण केली आहे. पण मुंडेंचा ( Pankaja Munde ) राजीनामा होण्याची कोणतीही शक्यता सध्या दिसत नाहीये. आज या निमित्ताने तुम्हाला दोन अशा राजीनाम्यांची गोष्ट सांगणार आहे की, जे प्रत्यक्षात झालेच नाही पण यानंतर त्या दोन व्यक्ती पुन्हा एकदा सत्तेच्या मुख्य पदावर आल्या. त्यातील पहिलं नाव म्हणजे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!( DevendraFadnavis)

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठी नामुष्की सहन करावी लागली. कधी नव्हे ते भाजपने राज्यात २८ लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या. पण या निवडणुकीत राज्यात भाजपला मोठ्या पराभवाच्या सामना करावा लागला. २८ पैकी फक्त ९ जागांवर त्यांना विजय मिळवता आला. राज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांच्या व्यतिरिक्त जवळपास सर्व केंद्रीय मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ), पंकजा मुंडे, उज्ज्वल निकम ( Ujjval Nikam ), सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe ) अशा नामांकित लोकांचा विजय झाला नाही.
निकालानंतर राज्य भाजपमध्ये एक प्रकारची अस्वस्थता तयार झाली. भाजपच्या एका महिला नेत्यांनी ज्येष्ठ पत्रकार व युट्यूबर भाऊ तोरसेकर यांना नोटीस पाठवली. यानंतर तर भाजपच्या समर्थकांचा भडकाच उडाला. सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांना त्यांचे समर्थकच शिव्यांची लाखोली वाहू लागले. शेवटी फडणवीसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले. एकंदरित राज्यात झालेल्या पराभवाला जबाबदार कोण अशी सूप्त चर्चा सर्वत्र सुरु झाली.
अशातच तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद बोलावली. या परिषदेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्यासह इतरही अनेक मातब्बर मंडळी हजर होती. फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्या माध्यमांचे व जनतेचे लक्ष लागून होते. या परिषदेत फडणवीसांनी एक मोठा धक्का सगळ्यांनाच दिला. पराभवाची सर्वस्व जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री या पदावरुन पदमुक्त करण्यात यावं व संघटनेत काम करण्याची परवानगी द्यावी, अशी थेट मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली. फडणवीसांचा हा निर्णय तिथे पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व भाजप नेत्यांना देखील धक्का देणारा होता. यानंतर तत्काळ चंद्रशेखर बावनकुळे व अन्य नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही फडणवीसांना राजीनामा देऊ देणार नाही, असे सांगितले. गिरीश महाजन हे कदाचित उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे देखील बोलले जाऊ लागले. तर काहींनी, हे फडणवीसांचं राजीनामास्त्र ( Devendra Fadnavis Resign)आहे, असेही म्हटले.
यानंतर काही दिवसांत नरेंद्र मोदी ( Narendra Modi)यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे केंद्रात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाणार असेही बोलले जाऊ लागले. पण जाणकारांच्या म्हणण्यानुसार फडणवीसांनी अगदी वेळेत किंबहुना वेळेच्या आधीच हा राजीनाम्याचा डाव खेळला होता. वास्तविक ही निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर झाली होती. पण फडणवीसांनी सर्व परभवाची जबाबदारी स्वीकारत स्वत:ला पुन्हा एकदा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आणले व आपले स्थान आणखी भक्कम केले. त्यांचा राजीनामा तर झाला नाही याउलट त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला न भूतो असे यश मिळाले आणि देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजीनाम्याची व्यक्त केलेली इच्छा ते थेट राज्याचा मुख्यमंत्री अवघ्या ६ महिन्यांमध्ये ही किमया साधण्यात फडणवीसांंना यश आले होते.
यातील दुसरी राजीनाम्याची गोष्ट आहे ती, सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi Resign)यांची! नरेंद्री मोदी २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर गोध्रा येथे अयोध्येवरुन येणाऱ्या रामभक्तांच्या रेल्वेचा डब्बा समाज कंटकांनी पेटवून दिला होता. ती लोकं बाहेर पडू नये म्हणून रेल्वेच्या डब्याला तार देखील बांधण्यात आल्या होत्या. सर्व रामभक्त हे जळून खाक झाले. यानंतर गुजरातमध्ये सर्वत्र दंगल उसळली. ती दंगल मोदींनी घडवली, दंगल नियंत्रित करण्यात मोदींना अपयश आले यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली. गोध्रा येथील घटना स्थळाला मोदींनी भेट दिली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर मोदींचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढत होता. अखेर वाजपेयी यांनी आडवाणींना मोदींचा राजीनामा घेण्यास सांगितले.
त्यानंतर गोव्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी आडवाणी मोदींचा राजीनामा घेतील अशी चर्चा देखील माध्यमांमध्ये सुरु झाली होती. या अधिवेशनामध्ये मोदी यांनी भाषण करताना स्वत:च्या सरकारच्या कामांचा पाढा वाचला. आणि शेवटी त्यांनी पुढची भुमिका स्पष्ट होईपर्यंत मी माझा राजीनामा देतो असे व्यासपीठावरुनच जाहीर केले.
यानंतर सबंध सभागृहात एकच हडकंप उडाला. भाजपचे सर्व कार्यकर्ते घोषणा देऊ लागले. नरेंद्र मोदी झिंदाबाद, राजीनामा मागे घ्या, या घोषणांनी सर्व सभागृह दणाणून गेले होते. वाजपेयी आणि इतर नेत्यांना देखील हे काय घडतंय याची पुसटशी कल्पना देखील नव्हती.
खरं तर याच्या पडद्यामागे बऱ्याच घटना घडल्या होत्या. रा.स्व. संघाचा मोदींच्या राजीनाम्याला स्पष्ट विरोध होता. एवढेच नाही तर कार्यकर्त्यांमध्ये देखील याने चुकीचा संदेश गेला असता, असे बोलले गेले. त्यामुळे पडद्यामागून अरुण जेटली व प्रमोद महाजन यांनी कुशलतेने या गोष्टी घडवून आणल्या होत्या. मोदींच्या भाषणानंतर जेटली यांनी मोदींनी राजीनामा देऊ नये, असा प्रस्ताव मांडला तर महाजन यांनी त्याला अनुमोदन दिले. पुढे मोदींनी मुदतपूर्व राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरी जायची तयारी दर्शवली. गुजरात गौरव यात्रा काढून त्यांनी काँग्रेस व तत्कालीन निवडणूक आयुक्त यांच्यावर देखील निशाणा साधला. परिणामी पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने गुजरातमध्ये भाजपचे सरकार आले. बाकी पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहेच. २००७, २००१२ साली पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि २०१४ ते आता २०२४ पंतप्रधान अशी मोदींची कारकीर्द अजून सुरुच आहे.
एकंदरितच आपला राजीनामा सादर करुन दोन पाऊल मागे येण्याची तयारी या नेत्यांनी दर्शवली. अर्थात यामध्ये राजकीय डावपेच होते. पण किमान अशी तयारी यांनी दर्शवली. त्यामुळे सध्या मुंडेंची राजीनाम्याची मागणी सुरु असताना या दोन घटना सहज आठवल्या.
3 February 2025